गेल्या काही दिवसांपासून अनेक बड्या कंपन्यांमधून कर्मचारी कपातीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यामध्ये थेट गुगलपासून अॅमेझॉनपर्यंत अनेक आयटी कंपन्यांचाही समावेश आहे. त्यातच या वर्षी जून महिन्यात मंदी येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर ऑटोमोबाईल सर्विसिंगची सेवा पुरवणाऱ्या GoMechanic या स्टार्टअपनं तब्बल ७० टक्के कर्मचारी कपात करणार असल्याचं जाहीर केलं आहे. यासाठी त्यांनी कंपनीची धोरणं आणि चुकीचे आर्थिक अंदाज जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.

काय आहे GoMechanic?

२०१६मध्ये अमित भसिन यांनी त्यांच्या काही सहसंस्थापकांसमवेत गो मेकॅनिक या स्टार्टअपची स्थापना केली होती. वाहनधारक आणि दुरुस्ती सेवा पुरवणारे गॅरेज यांच्यातील दुवा म्हणून कंपनीनं आपली सेवा द्यायला सुरुवात केली. अल्पावधीतच कंपनीनं मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक उभी केली आणि आपला विस्तार केला. दोन वर्षांपूर्वी कंपनीनं तब्बल ४२ मिलियन डॉलर इतकी गुंतवणूक खुल्या बाजारातील दिग्गज गुंतवणूकदारांकडून उभी केली. पण दोन वर्षांच्या आत कंपनीनं जाहीर केलेले आकडे चुकीचे होते असं मान्य केलं आहे.

State Government approved one time transfer for Community Health Officers under National Health Mission
आता समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्याही बदल्या होणार
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
issue of ministery post between Devendra Fadnavis Eknath Shinde and Ajit Pawar is likely to be resolved in Delhi
खातेवाटपाचा पेच आता दिल्लीतच सुटण्याची शक्यता
constitution of india credit loksatta
चतु:सूत्र : संविधाननिर्मितीचे श्रेय कोणाला?
Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde ,
खातेवाटपाच्या पेचामुळे दोन उपमुख्यमंत्री बिनखात्याचे
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
loksatta readers response loksatta news
लोकमानस : सत्यकथनासाठी निवृत्तीचा मुहूर्त
loksatta readers feedback
लोकमानस: …त्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी!

नेमकं घडलं काय?

अमित भसीन यांनी बुधवारी यसंदर्भात त्यांच्या लिंक्डइन अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी कंपनीच्या संचालक आणि संस्थापकांनी कंपनीच्या भरभराटीचे, आर्थिक उलाढालींचे आकडे चुकीचे दिल्याचं मान्य केलं आहे. “बाजारपेठेतील स्पर्धेत टिकून राहण्याच्या आमच्या उद्दिष्टाची पूर्ती करताना आमचं आर्थिक धोरणांकडे दुर्लक्ष झालं. आम्ही वहावत गेलो. कंपनीच्या भरभराटीचे चुकीचे आकडे आम्ही सादर केले. यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो” असं या पोस्टमध्ये भसीन यांनी म्हटलं आहे.

gomechanic amit bhasin linkedin post
अमित भसीन यांची लिंक्डइन पोस्ट!

“आम्हाला हे सांगताना अत्यंत दु:ख होतंय की कंपनीच्या संस्थापकांनी जाणूनबुजून कंपनीच्या आर्थिक उलाढालींविषयी चुकीचे आकडे जाहीर केले. यामध्ये आमच्या नफ्यासंदर्भातल्या वाढीव आकड्यांचाही समावेश आहे. चुकीचे आकडे दिल्याची बाब संस्थापकांनीही मान्य केली आहे”, असंही भसीन यांनी म्हटलं आहे.

७० टक्के कर्मचारी कपात!

दरम्यान, भसीन यांनी या पोस्टमध्ये कंपनीला ७० टक्के कर्मचारी कपात करावी लागणार असल्याचं जाहीर केलं आहे. “कंपनी व्यवस्थापनाची पुनर्रचना केली जाणार आहे. ही पुनर्रचना दु:खदायक आहे. कारण यात आम्हाला साधारण ७० टक्के कर्मचारी कमी करावे लागणार आहेत. तटस्थ संस्थेमार्फत कंपनीच्या आर्थिक व्यवहारांचं ऑडिटही केलं जाणार आहे”,असंही भसीन यांनी या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

Gomechanic वर १२० कोटींचं कर्ज

गुरुग्राममध्ये मुख्यालय असलेल्या गोमेकॅनिकवर सध्या १२० कोटींचं कर्ज आहे. हे कर्ज फेडण्यासाठी त्यांना बाजारपेठेतून पुन्हा निधी उभारावा लागणार आहे. नफ्याचे चुकीचे आकडे जाहीर करून तेच ग्राह्य धरल्यामुळे कंपनीच्या आर्थिक उलाढालींवर मोठा परिणाम झाला. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करण्याची वेळ कंपनीवर ओढवली.

Story img Loader