लोकसभा निवडणुकीत भाजपशासित राज्यांमध्ये विजय मिळवून देण्यात नरेंद्र मोदी आणि उत्तम प्रशासन हे दोन घटक महत्वपूर्ण ठरले होते. जनतेने नरेंद्र मोदी आणि भाजपवर दाखवलेल्या विश्वासामुळेच हे सगळे शक्य झाल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी दिल्लीत सांगितले. भारतीय जनसंघाचे संस्थापक शामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राजनाथ सिंह बोलत होते. या कार्यक्रमाला लालकृष्ण अडवाणी यांच्यासह भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. यावेळी भाजपच्या ऑनलाइन सभासद नोंदणी उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

Story img Loader