स्टेटस सिम्बॉल म्हणून वापरला जाणारा आयफोन आपल्याकडे असावा अशी अनेकांची इच्छा असते. पण या फोनच्या किमती पाहूनच आपण काही दिवसांनी पैसे साठले की तो फोन घेऊ असे ठरवतो. मग कंपनी या फोनवर एखादी ऑफर कधी जाहीर करते याची आपण वाट पाहत राहतो. अशीच एक संधी आता आयफोन खरेदी करण्याची इच्छा असणाऱ्यांकडे चालत आली आहे. कंपनीने आपल्या दोन मॉडेलच्या किंमतीत कपात केल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे ग्राहकांना हे फोन कमी किंमतीत खरेदी करता येणार आहेत. iPhone7 आणि iPhone 8 च्या किमतीत कपात केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकताच अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये अॅपलचा एक खास इव्हेंट पार पडला. आयफोन Xच्या यशानंतर या इव्हेंटमध्ये कंपनीने आयफोन Xs, आयफोन Xs Max आणि आयफोन Xr असे तीन आयफोन लाँच केले. त्यानंतर या दोन मॉडेलची किंमत कमी केल्याने अॅपलच्या चाहत्यांसाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे. ही किंमत १०० डॉलर म्हणजे साधारण ७,२०० रुपयांनी कमी करण्यात आली आहे. त्यामुळे आता iPhone 7 हे मॉडेल ३२,३२८ रूपये खरेदी करता येईल तर iPhone 7 plus हा ४०,९६८ रुपयांना खरेदी करता येईल.

याबरोबरच iPhone ८ जवळपास ४३,१२८ रूपयांना iPhone 8 Plus ची किंमत ५०,३२८ असेल. या किंमती अमेरिकेतील असल्या तरीही भारतातही आताच्या किंमतीपेक्षा हा फोन १० हजार रुपयांनी स्वस्त मिळू शकेल. नवीन मॉडेल लाँच केल्यामुळे जुनी मॉडेल संपविण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला की काय अशी चर्चा तंत्रज्ञान क्षेत्रात सुरु आहे. बाकी काहीही असो पण iPhone7 आणि iPhone 8 खरेदी करण्याची इच्छा असणाऱ्यांना आता किंमत कमी झाल्यामुळे नक्कीच विचार करता येऊ शकतो.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Good news iphone price cut iphone 7 and iphone
Show comments