राज्यांमध्ये आणल्या जात असलेल्या धर्मांतरविरोधी विधेयकांवर सुरू असलेल्या चर्चेवर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पूर्वीच्या जम्मू-काश्मीर राज्याचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी शनिवारी प्रतिक्रिया दिली. “जे कोणी लोकांचे धर्मांतर करत असेल, ते तलवारीचा वापर करत नाही. एखाद्याचे चांगले काम आणि व्यक्तींचे चारित्र्य इतरांना धर्मांतरित करण्यास प्रभावित करते,” असं आझाद म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“जे कोणी लोकांचे धर्मांतर करत आहे ते तलवार वापरून, भीती दाखवून धर्मांतर करत नाही. एखाद्याचे चांगले काम आणि व्यक्तींचे चारित्र्य इतरांना धर्मांतरित करण्यास प्रभावित करते. एखाद्या विशिष्ट धर्मात भेदभाव न करता मानवतेची सेवा करण्यासाठी लोक धर्मांतर करतात, असे आझाद शनिवारी उधमपूर येथे एका कार्यक्रमाला संबोधित करताना म्हणाले.

विशिष्ट धर्माला लक्ष्य करण्यासाठी राज्यात धर्मांतर विरोधी विधेयक प्रस्तावित केले जात असल्याचा कर्नाटकमधील विरोधकांनी आरोप केल्यानंतर आझाद यांचं वक्तव्य आलंय. राज्यातील हिवाळी अधिवेशनात या विधेयकाला जोरदार विरोध झाला आहे. “कोणत्याही व्यक्तीने चुकीचे वर्णन, बळजबरी, अवाजवी प्रभाव, प्रलोभन किंवा कोणत्याही फसव्या मार्गाने, विवाहाद्वारे किंवा अन्य कोणत्याही मार्गाने व्यक्तीचे एका धर्मातून दुसर्‍या धर्मात धर्मांतर करू नये किंवा धर्मांतर करण्याचा प्रयत्न करू नये किंवा कोणताही कट रचू नये,” असे विधेयकात नमूद केले आहे.

याआधी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारचा प्रस्तावित धर्मांतरविरोधी कायदा हा केवळ प्रलोभनातून होणारे धर्मांतर रोखण्यासाठी असल्याचे सांगितले होते. “प्रस्तावित कायद्याचा कोणताही धर्म, त्यांच्या प्रथा आणि परंपरांवर परिणाम होणार नाही ज्याची संविधानात हमी देण्यात आली आहे,” बोम्मई म्हणाले होते.

या वर्षाच्या सुरुवातीला, गुजरात विधानसभेने ‘गुजरात धर्म स्वातंत्र्य कायदा, २०२१’ बहुमताने पारित केला होता, यामध्ये लग्नाच्या माध्यमातून सक्तीने धर्मांतर करणार्‍यांसाठी कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. गुजरातशिवाय उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये देखील धर्मांतर विरोधी कायदे करण्यात आले आहेत.  