इहलोकीची यात्रा संपल्यानंतर आपल्या पश्चात आपल्या संपत्तीचा विनियोग कसा करावा, कोणाला किती वाटा द्यावा वगैरे सांगणारी लांबलचक यादी असलेले मृत्यूपत्र अनेकजण तयार करून ठेवतात. किंबहुना इहलोकीची यात्रा संपल्यानंतरच नव्हे तर निवृत्तीनंतर आपल्या संपत्तीचे, ती कोणत्याही स्वरूपातील असो, काय नियोजन व्हावे याचीही तजवीज करून ठेवणारे अनेकजण असतात. मात्र, या डिजिटल युगात आपल्या पश्चात आपले ई-मेल्स, नेटविश्वातील आपली काही खासगी पत्रे, छायाचित्रे वगैरेचे काय होणार याची आताच्या काळात अनेकांना चिंता लागून राहिलेली असते. मात्र, त्यावर आता गुगलनेच तोडगा काढला आहे.. इनअ‍ॅक्टिव्ह अकाऊंट मॅनेजरच्या साह्य़ाने तुम्ही डिजिटल मृत्यूपत्र/इच्छापत्र तयार करू शकता.
इनअ‍ॅक्टिव्ह अकाऊंट मॅनेजर
* अकाऊंट सेटिंग पेजवर हा मॅनेजर असेल
* तुमच्या पश्चात ज्या व्यक्तींनी तुमचा डिजिटल डेटा पहावा अशी तुमची इच्छा आहे त्यांची नावे, संपर्क क्रमांक, ई-मेल पत्ता वगैरे या अकाऊंट मॅनेजरवर नोंदवायचे
* आपल्या पश्चात किती कालावधीनंतर हा डेटा इतरांशी शेअर केला जावा याचा पर्याय या ठिकाणी उपलब्ध असेल
* त्यावर तुमचा डेटा जाळायचा (बर्न) किंवा कसे, अथवा त्याची नेमकी विल्हेवाट कशी लावायची याविषयीचे पर्याय अकाऊंट मॅनेजरवर उपलब्ध असतील
यांना ही योजना लागू आहे..
० जी-मेल ० गुगल ड्राइव्ह ० यूटय़ूब ० गुगलप्लस
टाइमआऊट कालावधी
* तुमच्या पश्चात तुमचे अकाऊंट कोणाशी किती कालावधीनंतर शेअर करायचे याचा पर्याय असेल
* तुम्ही तीन, सहा, नऊ आणि बारा महिन्यांचा टाइमआऊट कालावधी त्यासाठी देऊ शकाल
* तुम्ही नमूद केलेला टाइमआऊट कालावधी पूर्ण होण्याच्या एक महिना आधी गुगल संबंधितांना ई-मेल पाठवून तुमच्या इच्छापत्राची माहिती देईल
* इनअ‍ॅक्टिव अकाऊंट मॅनेजरचा वापर करून तुम्ही तुमचे अकाऊंट केव्हा निष्क्रिय (इनअ‍ॅक्टिव्ह) करायचे याचा सुस्पष्ट कालावधी नमूद करू शकाल
* तुम्ही दिलेल्या व्यक्तींशी संपर्क झाल्यानंतर त्या डेटाबद्दल निर्णय घेतला जाईल
* अकाऊंट निष्क्रिय झाल्यानंतरही कोणीच संपर्क न साधल्यास गुगल तुमचा डेटा डिलीट करेल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा