अल्ला रक्खा खान यांना तबल्याचा जादूगार असे म्हटले जाते. आज त्यांची ९५वी जयंती आहे. त्यांना मानवंदना देण्यासाठी आज गुगलने आपले विशेष डुडल बनवले आहे. गुगलने आपल्या गुगल- डुडलमध्ये दोन्ही ‘O’ वर अल्ला रक्खा खान हे तबला वाजवताना दाखविलेले आहेत.

कुरैशी अल्ला रक्खा खान यांचा जन्म २९ एप्रिल १९१९ला फगवाल, जम्मू येथे झाला होता. वयाच्या १२व्या वर्षापासून अल्ला रक्खा खाँ यांचे तबल्याशी नात दृढ झाले होते. १९४० ला ते मुंबई आकाशवाणीत रुजू झाले. त्यांचे शिष्य त्यांना अब्बाजी म्हणत असतं. अल्लारखा प्रसिद्ध तबलावादक तर होतेच, शिवाय त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांनाही ‘अल्ला रखा’ आणि ‘ए. आर. क़ुरेशी’ या नावांनी संगीत दिले होते. माँ बाप, सबक़, बेवफ़ा हे त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांपैकी काही चित्रपट होते. माँ बाप चित्रपटात त्यांच्या आवाज़ातेले गाणेही ऐकायला मिळते. ते गाणे अनेक संग्राहकांकडे उपलब्ध आहे. अल्लारखांकडून काही बंदिशी मिळाल्याचा लाभ भीमसेन जोशी यांच्यासहीत काही दिग्गज गायकांना झालेला आहे. सतारवादक रविशंकर आणि सरोदवादक अली अकबर खान यांच्याबरोबर अल्लारखांची खास जोडी जमली होती.
अल्ला रक्खा खान यांना १९७७ साली पद्मश्री पुरस्काराने तर १९८२ साली संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ३ फेब्रुवारी २००० रोजी मुंबईत त्यांच निधन झाले. त्यांच्या निधनानंतर तबल्याचे एक युग संपले असे म्हटले जाते. पण त्यांच्या ध्वनिफित केलेले अल्बम आणि संगीतरजनी यांच्यातून ते कायम जिवंत राहतील. जेव्हा जेव्हा पंजाब घराण्याची चर्चा होते तेव्हा उस्ताद अल्ला रक्खा खान यांच्या नावाची चर्चा होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा