सर्च इंजिनसाठी प्रसिद्ध असलेल्या गुगलने आता उत्तराखंडमधील प्रलयाने उद्ध्वस्त झालेल्या लोकांसाठी गुगल आपत्ती प्रतिसाद (गुगल क्रायसिस रिस्पॉन्स) ही नवीन ऑनलाइन सुविधा सुरू केली आहे.
गुगलच्या या सुविधेंतर्गत होम पेजवर गुगल क्रायसिस रिस्पॉन्स असे शब्द दिसतील. त्यात रिसोर्स नावाची लिंक असेल, त्यावर क्लिक केल्यास पुनर्वसन व मदतकार्य यांची राज्यनिहाय नियंत्रण कक्षातील माहिती कळू शकेल. वैद्यकीय मदत केंद्रे कुठे आहेत हे समजू शकेल. ज्यांची सुटका करण्यात आली आहे, ज्या भागात मदतकार्य पूर्ण करण्यात आले आहे, जिथे लोक अडकलेले आहेत अशा भागांची माहितीही त्यात मिळणार आहे. रस्त्यांची माहिती, देणगी पेटय़ांची ठिकाणे, मोबाइल संदेश सुविधेची ठिकाणे ही माहितीही यात उपलब्ध आहे.
गुगलने पर्सन फाइंडर म्हणजे व्यक्तिशोध ही नवीन सुविधाही दिली असून, त्यात अडकून पडलेल्या व्यक्तींची माहिती दिली आहे. यात तुम्ही व्यक्तीचा शोध घेण्यासाठी ९७७३३००००० या क्रमांकावर रिक्वेस्ट स्टेटस या नावाने एसएमएस पाठवू शकता. सध्यातरी १९३०० नोंदी पाहून तुम्हाला संबंधित व्यक्तीचा ठावठिकाणा सांगितला जातो.
होम पेजवर असे म्हटले आहे, की उत्तराखंडमध्ये जलप्रलयाने मोठे नुकसान झाले असून, तेथील मदतकार्य व पुनर्वसन कार्य याबाबत आमच्याकडे जे माहितीस्रोत आहेत, त्यातील माहिती आम्ही उपलब्ध करून देत आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेल्पलाइन क्रमांक
* उत्तरकाशी : (+९१) १३७४-२२६४६१,
* चमोली     :  (+९१)१३७२-२५१४३७, ९४११३५२१३६,
* रुद्रप्रयाग  : (+९१)१३६४-२३३७२७, ९४१२९१४८७५
* उत्तराखंड नियंत्रण कक्ष : (+९१)१३५-२७१०३३४, ९५५७४४४४८६)
या क्रमांकावर अडकलेल्या व्यक्तींची माहिती मिळू शकणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Google crisis response to help uttarakhand flood victims