१४ नोव्हेंबर म्हणजेच बालदिनानिमित्त आज गुगलच्या होमपेजवर खास डुडल झळकत आहे. ‘डुडल फॉर गुगल’ स्पर्धेचा विजेता ठरलेले हे डुडल विशाखापट्टणमच्या प्रकाश विद्यानिकेतन शाळेतील नऊ वर्षीय पी. कार्तिक याने काढले आहे. गुगलकडून प्रत्येक वर्षी अशाप्रकारची डुडल स्पर्धा आयोजित करण्यात येते. या स्पर्धेतील विजेत्या डुडलला गुगलच्या होमपेजवर स्थान दिले जाते. यंदाही ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी ‘If I could create something for India, it would be…’ या संकल्पनेवर आधारित डुडल्स स्पर्धकांकडून मागविण्यात आली होती. यामध्ये पी. कार्तिकने टाकाऊ वस्तुंच्या पुननिर्मितीतून पर्यावरणपूरक गोष्टींची निर्मिती करणाऱ्या यंत्राचे छायाचित्र काढले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा