इलेक्ट्रॉनिक सिग्नल यंत्रणेला १०१ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने इंटरनेटच्या महाजालात लोकप्रिय असलेल्या गुगल या सर्च इंजिनने खास डुडल तयार केले आहे. या डुडलमध्ये गुगलची इंग्रजी अद्याक्षरे लिहीलेली वाहने सिग्नल यंत्रणेच्या निर्देशांचे पालन करताना दिसतात. डुडलला ‘व्हिंटेज लूक’ देण्यात आल्याने त्यात लाल आणि हिरव्या रंगावरून वाहन चालकांना निर्देश देणारी सिग्नल यंत्रणा उठून दिसत आहे. दरम्यान, जगातील सर्वात पहिली इलेक्ट्रॉनिक सिग्नल यंत्रणा ५ ऑगस्ट १९१४ रोजी अमेरिकेच्या ओहायोतील क्लेवलँड शहरात उभारण्यात आली होती. त्यानंतर ही यंत्रणा सर्वदूर पसरली आणि जगभरात या यंत्रणेचे स्वागत झाले.
डुडलला देण्यात आलेला कृष्णधवल रंग त्याकाळाचे वर्णन करणारा असून सिग्नल यंत्रणेतील लाल आणि हिरवा रंग उठून दिसावा या उद्देशाने डिझाईन तयार करण्यात आले. इलेक्ट्रिक सिग्नल यंत्रणा सुरू झाली त्यावेळी पिवळया रंगाचा त्यात समावेश नव्हता. म्हणून येथे तो वापरण्यात आलेला नाही. काही वर्षांनंतर पिवळ्यारंगाचा समावेश सिग्नल यंत्रणेत करण्यात आला होता, असे गुगल डुडलच्या अधिकृत संकेतस्थळावर नमूद करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Google doodle honours the traffic signal