रशियातील सोची येथे आजपासून सुरू झालेल्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर गुगलने खास डूडल तयार केले आहे. हे डूडल नेटीझन्समध्ये तितकेच चर्चेत आहे कारण, या डूडलच्या रंगसंगीतवरून गुगलने रशियातील समलिंगी संबंधावर निर्बंध आणणाऱया कायद्यास विरोध दर्शविला असल्याचे स्पष्ट होते आहे.
या डूडलमध्ये इंद्रधनुष्याच्या सप्तरंगाची पार्श्वभूमी दिली गेली आहे आणि त्यावर वेगवेगळे खेळ खेळणारे खेळाडू दाखविले आहेत. परंतु, वापऱण्यात आलेली रंगसंगती समलिंगी संबंधाला पाठिंबा देणारी आहे. यावर स्पष्टीकरण देताना, आमचा डूडलच आमची भूमिका मांडेल, याचा अर्थ प्रत्येकजण कोणत्या विचाराने घेतो हे त्यांच्या स्वत:च्या वैयक्तीक मतावर अवलंबून आहे. असे गुगलने म्हटले आहे.
या डूडलखाली गुगलने म्हटले आहे की, “खेळ खेळणे हा मानवाधिकार आहे. कोणत्याही प्रकारच्या भेदभावाशिवाय प्रत्येकास खेळण्याची अनुमती हवी. खेळामध्ये न्यायाची भावना हवी.”  या आशयावरून डूडलमधून गुगलने रशियाच्या समलिंगी संबंधविरोधी कायद्यास विरोध दर्शविल्याचे स्पष्ट झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा