भारताच्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि कवयित्री सरोजिनी नायडू यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधत गुगलने गुरुवारी विशेष डूडल तयार केले आहे. गुगलमधील दुसऱ्या ‘ओ’ या अक्षराच्या जागी सरोजिनी यांचे रेखाचित्र तर त्यातील ‘एल’ या अक्षराच्या जागी त्यांच्या काव्यलेखनाचे प्रतिक म्हणून ‘लेखणी’ यांच्या मदतीने हे डुडल सजविण्यात आले आहे. मात्र यामुळे गेल्या काही दिवसांत गुगलच्या डुडलवरील भारतीय ‘मुद्रां’मध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
‘भारताच्या नायटिंगेल’ या नावाने सरोजिनी नायडू ओळखल्या जातात. १३ फेब्रुवारी, १८७९ हा त्यांच्या जन्मदिन. हैद्राबाद येथील चट्टोपाध्याय यांच्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. मद्रास इलाख्यात त्यांनी माध्यमिक शालांत परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावला होता. बंगालच्या फाळणीनंतर, त्यांनी स्वातंत्र्यलढय़ात उडी घेतली. वयाच्या १९ व्या वर्षी त्यांनी तत्कालीन समाजमनाच्या विरोध झुगारीत डॉ. गोविंदराजुलू नायडू यांच्याशी आंतरजातीय विवाह केला. भारतात १८९६ मध्ये पसरलेल्या प्लेगच्या साथीदरम्यान त्यांनी केलेल्या अद्वितीय कामगिरीबद्दल ब्रिटीश सरकारने त्यांचा ‘कैसर ए हिंद’ पुरस्कार देत गौरवही केला होता. स्वतंत्र भारतातील पहिल्या महिला राज्यपाल होण्याचा मानही नायडू यांना मिळाला होता. त्यांनी उत्तर प्रदेशचे राज्यपाल पदही भूषविले होते. २ मार्च, १९४९ रोजी त्यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
गुरुवारी त्यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधत गुगलने डुडलच्या माध्यमातून त्यांना आदरांजली वाहिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

* गुगल डुडल आणि भारत
ऑनलाईन विश्वात नेटीझन्सच्या जागतिक ‘मूड’चे प्रतिबिंब गुगलच्या डुडलवर उमटलेले पहावयास मिळते. त्यामुळे गेल्या काही वर्षांत डुडल हे जणू ‘सांस्कृतिक मानबिंदू प्रतिक’ ठरू लागले होते. पहिले डुडल १९९८ मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर आजवर ७०० डुडल प्रसिद्ध झाली. अनेकदा विनोदी, कल्पनाप्रधान, संवादात्मक अशी विविध डुडल्स आजवर तयार करण्यात आली होती. याआधी भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत गुगलने विशेष डुडल आपल्या होमपेजवर ठेवले होते.