करोना आणि त्यावरून लागू करण्यात आलेल्या लॉगडाउनमुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. आता करोनाची लाट ओसरत आहे, तसे निर्बंध शिथिल केले जात आहेत. शक्य तिथे वर्क फ्रॉम होम सुरु आहे. मात्र आता गुगल कर्मचाऱ्यासाठी वाईट बातमी आहे. आता वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात केली जाण्याची शक्यता आहे. गुगलने आपल्या कर्मचाऱ्यांना घर आणि कार्यालयातून काम करताना पगारामधील फरक जाणून घेण्यास सांगितले आहे. कर्मचारी स्वत: साठी या फरकाची गणना करण्यास मोकळे आहेत आणि त्यांना त्या आधारावर निर्णय घ्यावा लागेल. ज्यांचे घर ऑफिसपासून खूप दूर आहे, असे लोक जे लांबचा प्रवास करून ऑफिसमध्ये येतात, त्यांचा पगार कापला जाऊ शकतो. फेसबुक आणि ट्विटरने आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात अशीच कपात केली आहे. कमी खर्चाच्या ठिकाणी राहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रमोशन मिळालेल्या कर्मचाऱ्यांचा पगारही कापला जाऊ शकतो.
गुगल कर्मचाऱ्यांसाठी वाईट बातमी; वर्क फ्रॉम होम करत असाल तर…
गुगलने आपल्या कर्मचाऱ्यांना घर आणि कार्यालयातून काम करताना पगारामधील फरक जाणून घेण्यास सांगितले आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 10-08-2021 at 20:01 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Google employees who work from home could pay cut in salary rmt