अमेरिकी सरकार परदेशी व्यक्तींच्या इंटरनेटवरील माहितीवर गुप्तपणे लक्ष ठेवत असल्याच्या प्रश्नावर अमेरिकेत गदारोळ माजलेला असतानाच आता इंटरनेट कंपन्या, गुगल व फेसबुक यांनी अमेरिकी सरकारच्या अशा प्रकारच्या कुठल्याही प्रकल्पात आमचा सहभाग नाही असे स्पष्ट केले आहे. गुगल व फेसबुक या अमेरिकी कंपन्यांनी असे म्हटले आहे की, पीआरआयएसएम (प्रिझ्म) या सांकेतिक नावाने राबवण्यात आलेल्या कार्यक्रमाची आपल्याला काहीही माहिती नव्हती. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याच्या मोठय़ा बातम्या आल्यानंतरच आम्हाला त्याबाबत समजले.
फेसबुकचे संस्थापक मार्क झकरबर्ग यांनी म्हटले आहे की, फेसबुकने कधीही अमेरिका किंवा इतर कुठल्या सरकारला आमच्या सव्र्हरला हात घालण्याची संधी दिलेली नाही, आम्हाला कुठल्याही सरकार संस्थेने तशी विनंती करून माहिती किंवा मेटाडेटा मागितलेला नाही पण जर आम्ही तसे केले असेल तर आम्ही अधिक आक्रमकतेने त्याचा मुकाबला करून आम्ही कालपर्यंत प्रिझ्म हा शब्दही ऐकलेला नव्हता.
गुगलचे सह संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी लॅरी पेज व मुख्य विधी अधिकारी डेव्हिड ड्रमंड यांनी ब्लॉगवर लिहिले आहे की, आम्ही अमेरिकी व इतर कुठल्याही देशाच्या सरकारने माहितीवर पाळत ठेवण्याच्या किंवा ती काढून घेण्याच्या हेतूने आखलेल्या कुठल्याही कार्यक्रमात सहभागी झालेलो नाही.
अमेरिकी सरकारच्या माहिती संकलन सहभागावर गुगल, फेसबुकचे कानावर हात
अमेरिकी सरकार परदेशी व्यक्तींच्या इंटरनेटवरील माहितीवर गुप्तपणे लक्ष ठेवत असल्याच्या प्रश्नावर अमेरिकेत गदारोळ माजलेला असतानाच आता इंटरनेट कंपन्या, गुगल व फेसबुक यांनी अमेरिकी सरकारच्या अशा प्रकारच्या कुठल्याही प्रकल्पात आमचा सहभाग नाही असे स्पष्ट केले आहे.
First published on: 09-06-2013 at 03:59 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Google facebook helpless on the participation of american governments information collection