गुगलचे ‘गुगल प्लस’ इतिहासजमा होणार आहे. समाजमाध्यमांतील ‘फेसबुक’च्या वाढत्या लोकप्रियतेला तगडा पर्याय म्हणून अमेरिकन कंपनीने चार वर्षांपूर्वी ‘प्लस’ची निर्मिती केली होती; परंतु लोकांच्या पसंतीची मोहोर उमटवण्यात व्यवस्थापनाला यश आले नाही.
गुगलशी संबंधित सर्व कामकाजाकरिता मध्यवर्ती केंद्र म्हणून ‘प्लस’ला स्थान होते. मात्र गेले काही महिने ‘प्लस’चे वेगवेगळे खंड करून ग्राहकांना सेवा देण्यावर भर देण्यात आला होता.
सोमवारी कंपनीने अचानक ‘गुगल प्लस’च्या समाप्तीचीच घोषणा करून ‘नेटकऱ्यांना’ धक्का दिला. अर्थात येत्या काही महिन्यांत ‘प्लस’ नव्याने मांडणी करण्यात येईल. ‘गुगल प्लस’च्या स्वरूपातील भविष्यातील बदल आमूलाग्र असतील. गुगलची ही दोन उत्पादने ध्वनिचित्रफीत आणि छायाचित्रे अशी असतील.
याआधी, गुगलच्या उत्पादनातील (से), यूटय़ूबवरील ध्वनिचित्रफितीवर भाष्य करण्यासाठी ‘गुगल प्लस’ प्रोफाइल आवश्यक होते. परंतु ते फार काळ टिकले नाही. गुगलच्या सर्व कामकाजांसाठी एकाच खात्याचा (अकाऊंट) वापर करता आला तर ते अधिक सोयीचे ठरेल, अशी सूचना अनेकांकडून आली होती, अशी प्रतिक्रिया ‘गुगल’चे उपाध्यक्ष (छायाचित्रे आणि शेअरींग) ब्रॅडले होरोवित्झ यांनी कंपनीच्या ब्लॉगवर दिली आहे.
येत्या काळात एकाच खात्यातून ‘गुगल’शी संबंधित सर्व कामकाज करता येणार आहे. यात ‘पोस्ट’ शेअर करणे, त्या वाचण्याची सुविधा असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा