पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा जगातील टॉप टेन गुन्हेगारांच्या यादीत समावेश केल्याबद्दल अलाहाबाद न्यायालयाने ‘गुगल’ कंपनी, तिचे सीईओ आणि कंपनीचे भारतातील प्रमुख यांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी कंपनीविरुद्ध गुन्हेगारी खटला दाखल करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
जगातील दहा प्रमुख गुन्हेगारांची नावे गुगलवर सर्च केल्यावर त्यामध्ये मोदींचा फोटो दिसत होता. मोदींचे नाव हटविण्यासाठी तक्रारदाराने ‘गुगल’शी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ‘गुगल’ने त्यांना कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्यांनी वकील सुशीलकुमार मिश्रा यांच्यामार्फत या प्रकरणी न्यायालयात तक्रार दाखल केली. पण हे प्रकरण दिवाणी असल्याचे सांगत त्यांची याचिका ३ नोव्हेंम्बर २०१५ पर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, वकील सुशील कुमार मिश्रा यांनी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्या निर्णयाविरोधात आव्हान देत पुनरावृत्ती अर्ज केल्यानंतर याचिका स्वीकारण्यात आली. त्यावर नुकतीच सुनावणी झाली. या प्रकरणी पुढील सुनावणी ३१ ऑगस्टला होणार आहे. मोदींचे नाव गुगलवर गुन्हेगारांच्या यादीत दिसत असल्यामुळे गुगलविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने हे गुगल कंपनी, तिचे सीईओ आणि भारतातील प्रमुख यांना नोटीसही बजावली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा