Google Map : गुगल मॅपमुळे अनेक रस्ते आपल्याला समजतात. गुगल मॅपचा वापर करुन अनोळखी ठिकाणी नवीन व्यक्ती सहज पोहोचतो. गुगल मॅप आपल्याला फक्त मार्गच दाखवत नाही तर रहदारीची माहिती देखील देते. मात्र, गुगल मॅपने चुकीचा मार्ग दाखवल्यामुळे अपघाताच्या अनेक घटना घडल्याचंही पायला मिळालेलं आहे. अनेकवेळा असं घडतं की, गुगल मॅप आपल्याला चुकीच्या ठिकाणी घेऊन जाते. त्यामुळे अनेकांना मोठ्या मनस्तापाला समोरं जावं लागल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत. आता असाच एक धक्कादायक प्रकार आसाम पोलिसांबरोबर घडला आहे.
नेमकं काय घडलं?
आसामच्या पोलिसांचं १६ जणांचं एक पथक एका ठिकाणी छापा टाकण्यासाठी जात होतं. मात्र, पोलिसांना एका ठिकाणी जायचं होतं. मात्र, गुगल मॅपने चुकीचा मार्ग दाखवल्यामुळे पोलीस भलत्याच ठिकाणी पोहोचले. झालं असं की, आसाम पोलिसांच्या १६ जणांचं एक पथक एका आरोपीला पकडण्यासाठी जात होतं. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलीस त्या ठिकाणी छापा टाकणार होते. छापा टाकण्यासाठी पोलीस निघाले. मात्र, जात असताना पोलिसांनी गुगल मॅपचा वापर करत पोलीस कारवाईसाठी निघाले. मात्र, घडलं असं की पोलिसांना गुगल मॅपने चुकीचा मार्ग दाखवला आणि आसामचे पोलीस थेट नागालँडमध्ये पोहोचले.
नागालँडच्या मोकोकचुंग जिल्ह्यात मंगळवारी रात्री ही घटना घडली. आसामचे पोलीस चुकीच्या ठिकाणी पोहोचल्यामुळे तेथील स्थानिक लोकांनी त्यांच्यावर दरोडेखोर समजून हल्ला केला. यामध्ये पोलीस छापा टाकण्यासाठी जात असल्यामुळे साध्या वेशात जात होते. मात्र, यांच्यातील तीन जण गणवेशात होते. त्यामुळे स्थानिकांनी त्यांना गुन्हेगार समजून त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना रात्रभर कैद करून ठेवलं.
दरम्यान, त्यानंतर या संपूर्ण घटनेची माहिती नागालँड पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर नागालँड पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले. त्यानंतर या घटनेची माहिती नागालँड पोलिसांनी घेतली आणि पोलीस कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली. दरम्यान, या सर्व प्रकारामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. यासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने इंडिया टुडेनी दिलं आहे.