भारताच्या 66 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलने एका खास डूडलद्वारे भारतवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. गुगलने डुडलच्या माध्यमातून भारताच्या विविधतेतील एकता मांडण्याचा प्रयत्न केला असून यात इंडिया गेट, राष्ट्रपती भवन अशा महत्त्वाच्या वास्तूंचे दर्शन घडविले आहे. तसेच पारंपारिक वेशभूषा परिधान केलेले स्त्री-पुरूष या डूडलमध्ये दाखविण्यात आले आहेत. यातून भारतातील विविध राज्यांतील पारंपारिक विविधतेचे दर्शन तेथील नागरिकांच्या पोशाखांतील विविधतेतून घडविण्याचा प्रयत्न या डूडलमधून करण्यात आला आहे.
गुगलकडून डूडलद्वारे प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
भारताच्या 66 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलने एका खास डूडलद्वारे भारतवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
First published on: 26-01-2015 at 02:38 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Google marks 66th republic day with doodle