भारताच्या 66 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलने एका खास डूडलद्वारे भारतवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. गुगलने डुडलच्या माध्यमातून भारताच्या विविधतेतील एकता मांडण्याचा प्रयत्न केला असून यात इंडिया गेट, राष्ट्रपती भवन अशा महत्त्वाच्या वास्तूंचे दर्शन घडविले आहे. तसेच पारंपारिक वेशभूषा परिधान केलेले स्त्री-पुरूष या डूडलमध्ये दाखविण्यात आले आहेत. यातून भारतातील विविध राज्यांतील पारंपारिक विविधतेचे दर्शन तेथील नागरिकांच्या पोशाखांतील विविधतेतून घडविण्याचा प्रयत्न या डूडलमधून करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा