आफ्रिकेत वर्णद्वेषाविरूद्ध दिलेल्या खंबीर लढ्यासाठी ओळखले जाणारे नेल्सन मंडेला यांच्या ९६व्या जयंतीनिमित्त गुगल-डूडलच्या माध्यमातून खास पद्धतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ‘लाँग वॉक टू फ्रीडम’ या स्लाईड शोच्या माध्यमातून नेल्सन मंडेला यांचे विचार अनोख्या पद्धतीने मांडण्यात आले आहेत. आफ्रिकेतील वर्षद्वेषाविरूद्धच्या लढाईतील क्रांतिकारक ते दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती असा नेल्सन मंडेलांचा जीवनप्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. ‘वर्ण, जात किंवा धर्माच्या कारणावरून जन्म:त कोणीही एकमेकांचे शत्रू नसतात’ या वाक्यापासून सुरू होणारा प्रवास डूडलच्या माध्यमातून अत्यंत रंजक पद्धतीने मांडण्यात आला आहे.    

Story img Loader