चालकविरहीत कार बाजारात आणण्याच्या ‘गुगल’च्या महत्त्वाकांक्षी योजनेला मोठा धक्का बसला आहे. ‘गुगल’च्या ‘ड्रायव्हर लेस’ कारच्या चाचणीवेळी अपघात झाल्याचे वृत्त आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये आहे. त्यामुळे चालकविरहीत कार बाजारात आणण्याच्या ‘गुगल’च्या मनसुब्यांवर पाणी फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कॅलिफोर्नियायेथील ‘गुगल’च्या मुख्यालयाजवळ दोन आठवड्यांपूर्वी ‘लेक्सस एसयूव्ही’ या ‘गुगल’च्या चालकविरहीत कारची चाचणी घेण्यात येत होती. त्यावेळी कारने बाजूने जाणाऱया एका प्रवासी बसला धडक दिल्याने अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवतहानी झाली नाही. मात्र, ही कार भविष्यात कितपत यशस्वी ठरेल याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in