मानवी इतिहासात जमा झालेले सर्व ज्ञान गोळा करून त्याचा संग्रह करण्याची महत्त्वाकांक्षी योजना गुगलने आखली असून या ज्ञानसाठय़ात इंटरनेटवर जगातील अनेक गोष्टींबाबत असलेली माहिती आपोआप गोळा केली जाणार आहे व त्यामुळे हा ज्ञानसंग्रह फार मोठा असणार आहे.
गुगल सर्च इंजिन शोधून काढणाऱ्या गुगल कंपनीचा हा ज्ञानकुंड म्हणजे एक प्रकारचा नॉलेज बेस असणार असून त्यात माहिती साठवली जाईल व ती यांत्रिक तसेच मानवी पातळीवर वाचता येईल. गुगलचा सध्याचा नॉलेज बेस नॉलेज ग्राफ या नावाने ओळखला जातो. तो माहिती विस्तारासाठी क्राऊडसोर्सिगवर अवलंबून आहे. तथापि आता गुगलने या संपूर्ण प्रक्रियेला स्वयंचलित रूप दिले आहे.
माहिती आपोआप मिळण्यासाठी अलगॉरिथम तयार करण्यात आला असून त्यामुळे वेबवरून माहिती ओढली जाईल. ही माहिती मशिनच्या भाषेत कच्च्या स्वरूपात असली तरी ती वापरता येईल अशा स्वरूपात रूपांतरित केली जाईल. ज्ञानकुंभाने आतापर्यंत १.६ अब्ज बाबी माहितीच्या रूपात घेतल्या असून त्यापैकी २७१ दशलक्ष बाबी या तथ्यावर आधारित आहे.
गुगलच्या मॉडेलनुसार त्या ९० टक्के खऱ्या आहेत, असे न्यू सायंटिस्टने म्हटले आहे. बोस्टनमधील गार्टनर येथे काम करणारे टॉम ऑस्टिन या तंत्र विशेषज्ञाने सांगितले की, असे ज्ञानकुंभ तयार करण्यासाठी जगातील अनेक कंपन्या सरसावल्या आहेत. गुगल, मायक्रोसॉफ्ट, फेसबुक, अ‍ॅमॅझॉन व आयबीएम यांच्यात जोरदार स्पर्धा आहे. आपण विचार करू शकत नाही अशा बाबी घडवून आणण्यात या कंपन्या अग्रेसर आहेत. दहा वर्षांपासून या तंत्रज्ञानात काही समस्या जाणवत होत्या.
गुगल संशोधक केविन मर्फी व त्यांचे सहकारी यांनी न्यूयॉर्क येथे ज्ञानाचा शोध व माहितीचा शोध या विषयावर नॉलेज व्हॉल्ट परिषदेत शोधनिबंध सादर केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा