इंटरनेट मायाजालातील बलाढ्य कंपनी गुगलने आपल्या नव्या लोगोचे मंगळवारी अनावरण केले. चार रंगाचा वापर करून तयार करण्यात आलेला हा लोगो नेटिझन्सचे लक्ष वेधून घेऊ लागला आहे. त्याचबरोबर इंटरनेटवर सध्या ट्रेंडिगचा विषयही बनला आहे.
१९९९ नंतर पहिल्यांदाच कंपनीने लोगोमध्ये बदल केला आहे. कंपनीच्या वेगवेगळ्या उत्पादनांवर लवकरच नवा लोगो वापरण्यात येईल. सध्या गुगल सर्च इंजिनवर नव्या लोगोच्या वापराला सुरुवात झाली आहे. त्यासाठी कंपनीने अॅनिमेशनची मदत घेतली आहे. सर्च इंजिनवर गेल्यावर सुरुवातीला आलेला जुना लोगो पुसून टाकला जातो. त्यानंतर गुगलचा नवा लोगो तिथे लिहिला जातो. नवा लोगो सोशल नेटवर्किंग साईट्सवर शेअर करण्यासाठी तिथे सुविधाही देण्यात आली आहे. जास्तीत जास्त नेटिझन्सपर्यंत नवा लोगो पोहोचविण्याचा गुगलचा प्रयत्न आहे.
गुगलने गेल्या १७ वर्षांत अनेक बदल केले आहेत. नव्या उत्पादनांच्या निर्मितीसोबतच अस्तित्वात असलेल्या उत्पादनांमध्येही अनेक आकर्षक बदल करण्यात आले आहेत. आज पुन्हा एकदा आम्ही आमच्यामध्ये बदल करीत आहोत, असे गुगलने त्यांच्या अधिकृत ब्लॉगवर म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा