गुगल या तंत्रज्ञान कंपनीने आता स्पर्श पडद्यासारखे (टचस्क्रीन) कपडे बनवण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. कापड उद्योगात त्यामुळे क्रांती घडून येणार आहे. हे कपडे वाहकतेचा गुणधर्म असलेल्या धाग्यांपासून बनवण्यात येतात.

या प्रकल्पाचे नाव ‘जॅकार्ड’ असे असून गुगलच्या अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी अँड टेक्नॉलॉजी प्रयोगशाळेत याबाबत प्रयोग चालू असून त्यात स्मार्ट धागे वापरण्यात येणार आहेत. ते स्पर्श संवेदनशील असतील व नेहमीच्या धाग्यांबरोबर विणले जातील. स्पर्शपडद्यात वापरले जाणारे धागे बारीक, धातूच्या संमिश्रापासून बनवलेले असतात. ते कापसाच्या व रेशमी धाग्यांबरोबर वापरता येते. जॅकार्ड धागे असे वापरले जातात, ज्यात ते वापरणाऱ्याला कुठे वापरले आहेत हे दुप्पट जाडीवरून समजते पण एरवी ते बाहेरून कळत नाही. वहनक्षमता असलेल्या धाग्यांचा वापर यात केला जातो. या कपडय़ांना स्पर्श कळतो किंवा हातांच्या इशाऱ्यांवरून कृतीचा संदेश मिळतो. या कपडय़ात मोठय़ा पृष्ठभागात ते धागे विणले जातात त्यामुळे आंतरक्रियात्मक पृष्ठभाग मोठा असतो, असे या प्रकल्पाच्या संकेतस्थळावर म्हटले आहे.
यातील सर्किटस हे जॅकेटच्या बटनपेक्षा मोठे असणार नाहीत, वहनक्षमता असलेले धागे जोडून ते तयार केले जातील. इलेक्ट्रॉनिक्सचा हा सूक्ष्म अवतार येथे वापरला जाणार आहे. स्पर्शाच्या माध्यमातून तुम्हाला या कपडय़ातून इलेक्ट्रॉनिक उपकरणांना संदेश देता येऊ शकतो. यंत्राला समजू शकणाऱ्या अलगॉरिथमचा वापर यात केला जातो. स्पर्श व हातवाऱ्यांतून मिळणारी माहिती बिनतारी पद्धतीने मोबाईल फोनकडे वाहून नेली जाते. इतर अनेक उपकरणेही त्यावर चालवता येतात. त्यातून ऑनलाईन सेवा, अॅप्स चालवता येतात. गुगलने या धाग्यांचे प्रात्यक्षिक दाखवले असून त्यात फिलीप्सचे रंगीत दिवे स्पर्शाच्या माध्यमातून नियंत्रित करण्यात येतात. गिझमॅगने दिलेल्या माहितीनुसार या कपडय़ावर टिचकी मारली तर दिवे चालू होतात किंवा बंद होतात व विविध रंगांचे दिवे लावण्याचा क्रमही त्यात आणता येतो, त्याची प्रकाशमानता कमी-जास्त करता येते. जॅकार्ड हा फॅशन उद्योगासाठी एक मोठा कॅनव्हास आहे, त्यावर ते काहीही सुविधा देऊ शकतील. विशेष करून डिझायनर्सना या स्पर्शधाग्यांचा वापर करण्यासाठी कल्पनाशक्ती दाखवता येईल, त्यात त्यांना इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान कळण्याची आवश्यकता नाही.

A video of a leopard entering the garden of a house in Mount Abu
थेट घरात घुसला बिबट्या अन् बागेत फिरणाऱ्या कुत्र्यावर मारली झडप; थरारक घटनेचा Video Viral
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Little girl Happiness to burst the bubble wrap
VIRAL VIDEO : ‘बबल रॅप म्हणजे प्रेम!’ चिमुकलीचा उत्साह पाहून नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स; म्हणाले, ‘आम्हीसुद्धा लहानपणी…’
maharashtra winter updates
स्वेटर, शॉल शोधलीत का…? कारण, उद्यापासून हुडहुडी…
Lucknow NGO helps underprivileged children make Sabyasachi-inspired clothes; the designer reacts
झोपडपट्टीतील मुला-मुलींनी तयार केला सब्यसाची-प्रेरित ब्रायडल कलेक्शन! स्वत:च मॉडेलिंग करत केले हटके फोटोशूट, पाहा Video Viral
Anand Mahindra React on Dosa Printing Machine
फक्त मशिनमध्ये टाकायचं पीठ, मग कुरकुरीत गरमागरम डोसा छापून तयार; पाहा आनंद महिंद्रांनी शेअर केलेला VIRAL VIDEO
pune vada pav crime news
पुणे: गार वडापाव देताच डोके गरम झाले, ग्राहकाची विक्रेत्याला मारहाण

स्पर्शधाग्याचे नाव- जॅकार्ड
फिलिप्सचे रंगीत दिवे स्पर्श धागे वापरलेल्या कापडातून नियंत्रित करण्यात यश वहनक्षमता असलेल्या धाग्यांचा वापर फॅशन उद्योगासाठी कल्पनाशक्ती वापरण्याची संधी