उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे पशु-प्राण्यांवरील प्रेम कुणापासून लपलेले नाही. गाय आणि बछड्या सोबतचे त्यांचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच ३१ डिसेंबरला योगींनी असे ट्विट केले की काही वेळातच ते व्हायरल झाले. वास्तविक योगी आदित्यनाथ हे त्यांच्या गोरखपूरच्या दौऱ्यावर आले होते आणि गोरखनाथ मंदिरात त्यांच्या वास्तव्यादरम्यान योगी मंदिरात असलेल्या कार्यालयात बसले होते, तेव्हा अचानक एक मांजर आली आणि त्याच्या मांडीवर बसली.
ट्वीट काही वेळातच व्हायरल झाले..
अचानक मांडीवर बसलेल्या मांजराला पाहून मुख्यमंत्री हसायला लागले आणि बराच वेळ त्यांनी मांजरासोबत वेळ घालवला. योगींनी मांजरासोबतचा त्यांचा फोटो ट्विट केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘हित अनहित पसु पच्छिउ जाना”. या फोटोत मांजर योगींच्या मांडीवर शांतपणे बसलेली असून योगी हसत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. सोशल मीडियावर एक हजाराहून अधिक लोकांनी या फोटोवर कमेंट केल्या आहेत तर ३२०० हून अधिक लोकांनी ते रिट्विट केले आहे आणि ३२ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.
( हे ही वाचा: Video: जंगल सफारीसाठी गेलेल्या पर्यटकांच्या मागे लागला गेंडा; गाडीतील महिला पळवा पळवा म्हणत ओरडली पण…)
लोक कमेंट करत आहेत
याआधी योगी गोरखपूर प्राणीसंग्रहालयात बिबट्याच्या पिल्लांना खाऊ घालतानाचे अनेक फोटो व्हायरल झाले होते. आता मांजरासोबत योगी यांचे ट्वीट व्हायरल होताच सोशल मिडीयावर लोकांनी कंमेंट करायला सुरुवात केली आहे. एका युजरने कंमेंट केली आहे की, ‘चुहिया रानी तुम कब तक बच पाओगी,अब तो घात लगाये बैठी है बिल्ली भी किसी दिन तुम पंजे में आओगी’ विरोधकांनी हे स्वतःवर घेऊ नये. तर आणखी एकाने लिहिलंय की,’मी मांजर पाळतो, सिंह, गुंड आणि बैल पाळतो….’ तर अनेक युजर्सनी मांजरीसोबतचा फोटो शेअर करून ट्वीट रिट्विट केले आहे.