किराणा व्यापारात थेट विदेशी गुंतवणुकीला (एफडीआय) परवानगी देण्याच्या निर्णयावर उद्यापासून (मंगळवार) संसदेत सत्ताधारी यूपीए आणि विरोधी पक्षांमधील निर्णायक झुंज सुरू होणार आहे. मतविभाजनाची तरतूद असलेल्या नियम १८४ अंतर्गत एफडीआयवर मंगळवारी आणि बुधवारी लोकसभेत तर गुरुवार आणि शुक्रवारी राज्यसभेत सत्ताधारी आणि विरोधकांची शक्तीपरीक्षा होईल. यूपीए सरकारला बाहेरून पाठिंबा देत असलेल्या समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने एफडीआयच्या मुद्यावर आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. याविषयी अंतिम निर्णय सभागृहातील मतदानाच्या वेळीच घेण्यात येईल, असे सांगून बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी उत्कंठा कायम ठेवली.

Story img Loader