विमानतळ प्राधिकरणाचे सर्व विमानतळांना निर्देश

नवी दिल्ली : देशातील प्रत्येक विमानतळावर हिंदी आणि इंग्रजीनंतर स्थानिक भाषेतूनही उद्घोषणा कराव्यात, असे निर्देश बुधवारी सर्व विमानतळांना देण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांच्या निर्देशांनुसार हा निर्णय घेण्यात आला.

याबाबत विमानतळ प्राधिकरणाने आपल्या नियंत्रणातील सर्व विमानतळांना निर्देश जारी केल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

यासंदर्भात नागरी विमान वाहतूक विभागाने खासगी विमानतळ चालकांशीही संपर्क साधून स्थानिक भाषेत उद्घोषणा करण्यास सांगितले आहे. ज्या ठिकाणी प्रवाशांसाठी उद्घोषणा होत नाहीत, त्या विमानतळांनी हे निर्देश लागू नसतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

संघटनांची मागणी

विमानतळांनी हिंदी, इंग्रजीसोबत स्थानिक भाषेतही उद्घोषणा कराव्यात, याबाबत नागरी विमान वाहतूक मंत्रलयाने २०१६ मध्ये परिपत्रक काढले होते. काही संघटनांनी तशी मागणी केली होती. सध्या देशात १०० विमानतळे सुरू आहेत.

Story img Loader