भारत सरकार नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५ वी जयंती साजरी करत आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीचा उद्घाटन समारंभ २३ जानेवारी २०२१ रोजी व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल, कोलकाता येथे आयोजित करण्यात आला होता. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. दरम्यान, केंद्र सरकारने २३ जानेवारी हा दिवस पराक्रम दिन म्हणून घोषित केला आहे. केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली

१२५ जयंतीनिमित्त नेताजी सुभाष चंद्र बोस स्मारक नाणे, आणि टपाल तिकीटाचे सुद्धा प्रकाशन करण्यात आले. २३ जानेवारी २०२१ रोजी कोलकाता आणि ५ मार्च २०२१ रोजी जबलपूर येथे आंतरराष्ट्रीय सेमिनारचे आयोजन देखील करण्यात आले होते.

नेताजी आणि आजचा भारत

स्मरणोत्सवासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन

स्मरणोत्सवासाठी माननीय पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये प्रसिद्ध व्यक्ती, इतिहासकार, लेखक, तज्ज्ञ, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे कुटुंबातील सदस्य तसेच आझाद हिंद फौज (INA) शी संबंधित मान्यवरांचा समावेश आहे. १९ जानेवारी २०२१ रोजी राजपत्र अधिसूचना जारी करण्यात आली होती आणि २३ जानेवारीला दरवर्षी पराक्रम दिवस म्हणून घोषित करण्यात आले.

चिंतनधारा : स्वराज्याचा पाया सुराज्याने

 विविध प्रस्तावांना मान्यता

भारत सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित विविध प्रस्तावांना मान्यता दिली आहे. यामध्ये लाल किल्ल्यावर आणि कोलकाताजवळील नीलगंज येथे आयएनए शहीदांचे स्मारक उभारणे, नेताजी आणि आयएनएवरील लघुपट, आयएनए ट्रायल्सवरील माहितीपट, कर्नलचे चरित्र प्रकाशन, नेताजींवर चित्रात्मक पुस्तके, आयएनएचा चित्रांचे किड-फ्रेंडली कॉमिक्सच्या स्वरूपात प्रकाशनाचा समावेश आहे.

नेताजी फाइल्स : एका षड्यंत्र सिद्धान्ताची शोधयात्रा

भारत सरकार सर्व महत्वपुर्ण ठीकाणी नेताजी सुभाष चंद्र बोस संबंधित महत्त्वाच्या तारखा साजऱ्या करत आहे. यामध्ये १४ एप्रिल मोइरंग डे-भारतीय भूमीवर ब्रिटिश सैन्याचा पराभव, २१ ऑक्टोबर आयएनए स्थापना दिवस, ३० डिसेंबर नेताजी अंदमानला गेले आणि ध्वज फडकवण्यात आला, या दिवसांचा समावेश आहे.

Story img Loader