केंद्रीय मंत्रिमंडळाने शनिवारी डिझेलवरील सरकारी नियंत्रण काढून टाकल्याने डिझेलच्या दरामध्ये लिटरमागे ३.३७ रूपयांनी घट झाली. ऐन दिवाळीच्या तोंडावर सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे देशवासीयांना महागाईपासून थोडा दिलासा मिळण्याचे चिन्ह दिसत आहे. यापुढे डिझेलचे दर आंतरराष्ट्रीय तेल बाजाराच्या किमतींवर अवलंबून राहाणार आहेत. डिझेलच्या नव्या किमती शनिवारी रात्रीपासून लागू करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे केंद्रसरकारला आता डिझेवर कोणतेही अनुदान द्यावे लागणार नाही. नैसर्गीक वायू दरावर देखील केंद्रसरकारणे मोठा निर्णय घेत या वायूचे दर ठरवण्यासाठी दर सहामाही आढावा घेण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा