देहरादूनचा रहिवासी असलेला रिषभ कौशिक काही दिवसांपूर्वी प्रसिद्धीच्या झोतात आला होता. याचं कारण म्हणजे तो युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकला होता. आणि आपल्या कुत्र्याशिवाय तो भारतात परतण्यास तयार नव्हता. त्याने आपला एक व्हिडीओ सोशल मीडियावरही टाकला होता. या व्हिडीओमुळे तो चर्चेत आला होता.
त्याने या व्हिडीओतून भारत सरकारला आपल्यासोबत आपल्या कुत्र्यालाही युक्रेनमधून परत आणण्याची विनंती केली होती. त्याच्या या व्हिडीओमुळे पेटा या प्राण्यांसाठी काम कऱणाऱ्या संस्थेनेही युक्रेनमधल्या भारतीयांसोबत त्यांच्या पाळीव प्राण्यांना आणण्याची परवानगी द्यावी यासाठी अपील केलं होतं.
युद्धविषयक लाईव्ह अपडेट्ससाठी येथे क्लिक करा.
यानंतर भारत सरकारने केवळ एकदाच दिलेली सूट असा शेरा देत युद्धग्रस्त युक्रेनमधून विद्यार्थ्यांना आपल्यासोबत आपले पाळीव प्राणी जसं की कुत्रा, मांजर आणण्यास परवानगी दिली. त्यामुळे आता रिषभसोबत त्याचा कुत्राही भारतात परतू शकला आहे. त्याचा हा हट्ट भारत सरकारने पूर्ण केला असंच इथं म्हणावं लागेल.