स्वयंपाकासाठी लागणाऱ्या एलपीजी गॅसचे पाच किलोचे सिलिंडर उपलब्ध करून दिल्यानंतर आता सरकारने किराणा दुकानांमधून दोन किलोचे एलपीजी सिलिंडर उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे. आता नव्या गॅस जोडणीसाठी (कनेक्शन) ऑनलाइन बुकिंग करता येणार आहे.
एलपीजी सिलिंडर १४.२ किलोची असतात पण आता ते पाच व दोन किलोमध्ये उपलब्ध केले जात आहेत. १४.२ किलोच्या अनुदानित सिलिंडरची किंमत ४१८ रुपये आहे ते गरिबांना परवडत नाही. पाच किलोच्या सिलिंडर २०१३ मध्ये सुरू करण्यात आले, त्याची किंमत १५५ रुपये आहे. आता आम्ही २ किलोचे सिलिंडर सुरू करीत आहोत ते ग्रामीण लोकांना फायद्याचे आहे. जे लोक १४.२ कि लोचे सिलिंडर किंवा ५ किलोचे सिलिंडर घेऊ शकत नाही, त्यांना दोन किलोचे सिलिंडर परवडणारे आहे, असे पेट्रोलियममंत्री धर्मेद्र प्रधान यांनी सांगितले. नवीन गॅस कनेक्शन घेण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करता येईल व ४८ तासांत त्याची खातरजमा केली जाईल व लगेच जवळच्या एलपीजी गॅस केंद्राचा माणूस ३-४ दिवसांत तुमच्या दारात हजर असणार, असे प्रधान म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा