Sonali Phogat Death: उत्तर गोव्यातील अंजुना येथील ‘कर्लीज’ रेस्टॉरंट गोवा सरकारकडून पाडले जात आहे. सागरी सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या रेस्टॉरंटवर ही कारवाई केली जात आहे. हरियाणामधील भाजपाच्या नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगट यांचा याच रेस्टॉरंटमधील पार्टीनंतर मृत्यू झाला होता.

सोनाली फोगट मृत्यू प्रकरणाला नवं वळण, सीसीटीव्हीत धक्कादायक बाब उघड, दोन सहकाऱ्यांना बेड्या

गोव्याच्या प्रसिद्ध अंजुना बीचवरील हे रेस्टॉरंट फोगट यांच्या मृत्यूनंतर चर्चेत आले होते. या रेस्टॉरंटचे मालक एडवीन न्युन्स हे फोगट यांच्या मृत्यू प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाच जणांपैकी एक आहे. न्युन्स सध्या जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत. ‘गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी’ने(GCZMA) २०१६ साली नियमांच्या उल्लंघनप्रकरणी हे रेस्टॉरंट पाडण्याचे आदेश दिले होते. या आदेशाविरोधात न्युन्स यांनी राष्ट्रीय हरित प्राधिकरणाकडे दाद मागितली होती. प्राधिकरणाकडून दिलासा न मिळाल्याने आज अखेर हे रेस्टॉरंट जमीनदोस्त करण्यात येत आहे.

लडाखमधील तणाव निवळला; भारत, चिनी सैन्याची ‘धोरणात्मक माघार’

सोनाली फोगट यांचा २३ ऑगस्ट रोजी गोव्यात संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता. प्राथमिक तपासाअंती सोनाली २२ ऑगस्टला गोव्यातील अंजुना येथील हॉटेलमध्ये थांबल्या होत्या. हॉटेलमध्ये अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सोनाली यांच्या मृत्यूवर कुटुंबीयांनी संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांकडून या प्रकरणाचा हत्येच्या दृष्टीकोणातून तपास केला जात आहे.