कामगार भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या खात्यात २७,००० कोटी रुपयांची रक्कम पडून देशभरातील लाभधारकांना शोधून त्यांच्यापर्यंत ही रक्कम पोहोचवण्यासाठी सरकार विशेष मोहीम राबवणार असल्याची माहिती कामगार मंत्री बंदारू दत्तात्रय यांनी दिली. असोचॅमतर्फे आयोजित क्षमता विकास कार्यक्रमात ते बोलत होते. या खात्यात आणखी पैसे वापराविना साठून राहू नयेत म्हणून सरकार प्रयत्न करत असून त्यासाठी खासगी उद्योग क्षेत्राची मदत लागेल, असे ते म्हणाले.
याशिवाय देशातील रोजगार केंद्रे अधिक सक्षम करण्यासाठी येत्या अर्थसंकल्पात ३९० कोटी रुपयांची तरतूद करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नजीकच्या भविष्यकाळात देशात १० ते १२ कोटी युवकांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगार देता येतील असे ते म्हणाले.

Story img Loader