वेगळ्या तेलंगणा राज्याच्या निर्मितीसंदर्भात कोणतीही अंतिम तारीख (डेडलाईन) ठरविण्यास केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी नकार दिला. यासंदर्भात अद्याप चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
वेगळ्या तेलंगणाच्या निर्मितीसंदर्भात कोणती अंतिम तारीख ठरली आहे का, असे विचारल्यावर शिंदे यांनी यासंदर्भात विविध घटकांशी चर्चा सुरू असल्याचे सांगितले.
तेलंगणासंदर्भात गेल्या रविवारी केंद्र सरकार निर्णय जाहीर करण्याची शक्यता होती. मात्र, अजून विचारविनिमय आवश्यक असल्याचे सांगत सरकारने निर्णय पुढे ढकलला.
तेलंगणासंदर्भात महिन्याभरात निर्णय घेऊ, असे शिंदे यांनी गेल्या महिन्यात २८ तारखेला जाहीर केले होते.

Story img Loader