आंध्र प्रदेशचे विभाजन करून स्वतंत्र तेलंगणची निर्मिती करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिगटाची विषयसूची केंद्राकडून आंध्रातील आठ राजकीय पक्षांना विचारार्थ पाठविण्यात आली आह़े  या सूचीतील विषयांवर पक्षांनी आपली मते नोंदवायची आहेत़
आंध्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस, भाजप, तेलुगू देसम पार्टी, कम्युनिस्ट पक्ष, मास्र्कवादी कम्युनिस्ट पक्ष, तेलंगणा राष्ट्रीय समिती, वायएसआर काँग्रेस आणि ऑल इंडिया मजलिस – ए- इत्तेहादूल मुस्लिम यांना ही सूची पाठविण्यात आली आह़े आम्ही पाठविलेल्या सूचीचा या पक्षांनी अभ्यास करावा आणि त्यावर प्रतिक्रिया द्यावी, असे केंद्रीय गृह मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आल़े
स्वतंत्र तेलंगणच्या निर्मितीबाबत विविध मुद्दय़ांवर चर्चा करण्यासाठी येत्या आठवडय़ात सर्वपक्षीय बैठक बोलाविण्याचाही निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आल़े  ७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मंत्रिगटाच्या बैठकीपूर्वी ही बैठक होण्याची शक्यता आह़े  मंत्रिगटाची बैठक यापूर्वी दोनदा करण्यात घेण्यात आली़  त्यात नद्यांचे पाणी वाटप, वीज, मालमत्तांचे वाटप, राज्यांच्या सीमारेषा आदीबाबत चर्चा करण्यात आली़  केंद्रीय गृहमंत्र्यांच्या या मंत्रिगटाने विभाजनाबाबत कोणता दृष्टिकोन आणि पद्धती अवलंबावी याचीही चर्चा करण्यात आली़  आता मंत्रिगट आपल्या शिफारसी केंद्रीय कॅबिनेटला सादर करण्यापूर्वी राज्यातील पक्षांची मते विचारात घेणार आह़े
‘विषय सूची’त काय?
या सूचीत नव्या राज्यांच्या सीमा ठरविणे, निवडणूक, न्यायालयीन आणि वैधानिक आस्थापनांची पुनर्रचना आदींबाबतच्या धोरणांचा समावेश आह़े
ल्ल हैदराबाद ही सामायिक राजधानी ठेवून दोन्ही राज्यांचा कारभार दहा वर्षांपर्यंत सुरळीत चालावा, यासाठी आवश्यक प्रशासकीय आणि कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासंदर्भातही काही तरतुदी यात आहेत़.

Story img Loader