केंद्र सरकारची तसेच विविध सरकारी खाती आणि विभागांची संकेतस्थळे मंगळवारी सकाळी ठप्प झाली होती. सरकारची माहिती-तंत्रज्ञानविषयक यंत्रणा असलेल्या नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर अर्थात एनआयसीच्या सव्‍‌र्हरमध्ये काही काळ बिघाड झाल्याने संकेतस्थळांचे कामकाज बंद पडले होते, असे सरकारी माहितगारांनी स्पष्ट केले.
केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव जे सत्यनारायण यांनी सांगितले की, मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास एनआयसीच्या नियंत्रण कक्षात विद्युतपुरवठा खंडित झाला. परिणामी सरकारी संकेतस्थळांचे कामकाज काही काळासाठी ठप्प झाले, मात्र विद्युतपुरवठा पूर्ववत होताच काही तासांतच संकेतस्थळे कार्यान्वित झाली.

Story img Loader