राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राला आता नवीन राज्यपाल मिळणार असून, रमेश बैस यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील १३ राज्यपाल आणि उपराज्यपाल यांची बदली केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्राच्या राज्यपालांचाही समावेश आहे.
अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल – लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम पारनाईक, सिक्कीमचे राज्यपाल – लक्ष्मण प्रसाद आचार्य, झारखंडचे राज्यपाल – सीपी राधाकृष्णन, आसाम राज्यपाल – गुलाबचंद काटरिया आणि हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून शिवप्रताप शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर; नव्या राज्यपालांचे नाव आले समोर
याशिवाय राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांनी राधाकृष्णन माथूर यांचा लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर ब्रिगेडियर म्हणून राजीनामा स्वीकारला. बीडी मिश्रा यांची अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल यांची लडाखचे नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मणिपूरचे राज्यपाल ला गणेशन यांची नागालँडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बिहारचे राज्यपाल फागु चौहान यांची मेघालयाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची बिहारचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. निवृत्त न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर यांची आंध्र प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. आंध्र प्रदेशचे राज्यपाल बिस्व भूषण हरिचंदन यांची छत्तीसगडच्या राज्यपालपदी नियुक्ती आणि छत्तीसगडच्या राज्यपाल अनुसुईया उकिये यांची मणिपूरच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.