उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीवरून सत्तारूढ सपावर सातत्याने टीका करणारे राज्यपाल राम नाईक यांनी आता आपला मोर्चा विद्यापीठाकडे वळविला आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना मानद डॉक्टरेट देण्याच्या राज्य विद्यापीठाच्या योजनेवरच राज्यपालांनी प्रहार केला आहे. चणे-फुटाण्यांचे वाटप केल्याप्रमाणे अशा प्रकारचा बहुमान देण्यास आपला ठाम विरोध असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कानपूरमधील चंद्रशेखर आझाद कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाने ज्या सात मान्यवरांमधून एका व्यक्तीची निवड करावी, असे राम नाईक यांनी सांगितले होते. या सात जणांमध्ये अखिलेश यादव यांचा समावेश आहे.
कुलपती या नात्याने आपण विद्यापीठाला सात जणांपैकी एकाची निवड करण्यास सांगितले होते. मात्र अशा प्रकारच्या सन्मानाची शान राखली गेली पाहिजे, असे आपले ठाम मत आहे, असे नाईक म्हणाले. सन्मानांचे चणे-फुटाण्यांसारखे वाटप करणे आपल्याला मंजूर नाही, असे राम नाईक यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा