संसदेचे पावसाळी अधिवेशन ११ ऑगस्टला संपले. मणिपूर हिंसाचार, महागाई, बेरोजगारीच्या मुद्द्यांवरून विरोधकांनी पावसाळी अधिवेशन गाजवले. याच मुद्द्यांवरून विरोधकांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता. दरम्यान, आता सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विटरवरून दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >> पाच मजली इमारतीला भीषण आग, लहान मुलांसह ७३ जणांचा होरपळून मृत्यू; ‘ती’ एक चूक पडली महागात!

“संसदेचे विशेष अधिवेशन (१७ व्या लोकसभेचे १३ वे अधिवेशन आणि राज्यसभेचे २६१ वे अधिवेशन ) १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत बोलावले आहे. या अधिवेशनात पाच बैठका होणार आहेत. अमृत ​​काल दरम्यान संसदेत महत्त्वाची चर्चा होण्याची अपेक्षा आहे”, अशी माहिती प्रल्हाद जोशींनी दिली. दरम्यान, या अधिवेशनात कोणत्या मुद्द्यावरून चर्चा होणार याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. तसंच, १८ ते २२ सप्टेंबर काळात महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धामधूम असणार आहे. त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी बदलावा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

९ आणि १० सप्टेंबर रोजी दिल्लीत जी २० शिखर परिषद होणार आहे. या परिषदेनंतरच या विशेष अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. पण, अधिवेशनाचा अजेंडा अद्याप उघड करण्यात आलेला नाही.

दरम्यान, २० जुलै रोजी संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले होते. हे अधिवेशन ११ ऑगस्टला संपले. या पावसाळी अधिवेशनात लोकसभेने २२ विधेयके तर राज्यसभेने २५ विधेयके मंजूर केली. दोन्ही सभागृहांनी २३ विधेयके मंजूर करून पुढची प्रक्रिया सुरू केली आहे.

हेही वाचा >> “जम्मू-काश्मीरमध्ये कधीही निवडणुका घेण्यास सज्ज”; केंद्राची सर्वोच्च न्यायालयात माहिती

सुप्रिया सुळेंनी केली तारीख बदलण्याची मागणी

१८ -२२ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनाविषयी नुकतीच माहिती मिळाली. या अधिवेशात अर्थपूर्ण चर्चा आणि संवाद होईलच. पण महाराष्ट्रात याच काळात गणेशोत्सव असणार आहे. त्यामुळे या तारखेबाबत केंद्रीय संसदीय कार्यमंत्री विचार करतील, अशी विनंती सुप्रिया सुळेंनी केली आहे.

दरम्यान, या विशेष अधिवेशनात कोणत्या मुद्द्यांवरून चर्चा होणार याबाबत अद्यापही खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे या चर्चेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Govt calls special 5 day session of parliament from sept 18 no word on agenda yet sgk
Show comments