स्वत:चे प्राण धोक्यात घालून देशाची सेवा करणाऱया केंद्रीय पोलीस दलाला सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध असल्याचे भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे. ते केंद्रीय पोलीस दलाच्या वैद्यकीय संस्थेच्या शिलान्यास कार्यक्रमावेळी बोलत होते.
पंतप्रधान म्हणतात की, केंद्रीय पोलीस दलाच्या कर्मचाऱयांना सर्वोत्तम सुविध देण्यास सरकार कटीबद्ध आहे. त्यादृष्टीनेच आज या वैद्यकीय विज्ञान संस्थेची स्थापना करण्यासंदर्भातील एक अत्यंत महत्वाचे पाऊल केंद्र सरकारने उचलले आहे. या संस्थेमुळे देशाची सेवा करणाऱया सैनिकांना आणि त्यांच्या कुटूंबांनासुद्धा उत्तम वैद्यकीय सुविधा देणे शक्य होईल.” असेही पंतप्रधान म्हणाले.
या वैद्यकीय संस्थेद्वारे देशातील सीआरपीएफ, बीएसएफ, सीआयएसएफ, आयटीबीपी, एसएसबी आणि एनएसजी सैन्य दलाला आणि त्यांच्या कुटुंबियांना वैद्यकीय सेवा पुरविली जाणार आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा