मोदी सरकारने नुकतातच आर्थिक पाहणी अहवाल सादर केला, जो माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना आवडलेला नाही. चिदंबरम म्हणाले की, यामध्ये वस्तुनिष्ठ दृष्टीकोन दिसत नाही, हे सरकार केवळ रियरव्ह्यू मिरमधून पाहतंय. इकोनॉमिक सर्वेमध्ये बऱ्याच गोष्टी या रियरव्ह्यू मिररमधून पाहिल्यात असं वाटतंय. चिदंबरम म्हणाले की, “गेल्या वर्षी काय झालं, गेल्या ५ वर्षात काय झालं हे पाहणं गरजेचं आहे. परंतु यामधून तुम्हाला हे कळणार नाही की, आपण पुढे काय करणार आहोत. परंतु यामधून महत्त्वाची गोष्ट कळत नाही ती म्हणजे आपण पुढे (भविष्यात) काय पाहतोय.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चिदंबरम यांनी आगामी काळातल्या नुकसानाबद्दल इशारा देत म्हटलं की, “परिस्थितीचा सामना कसा करायचा यापेक्षा रियरव्ह्यू मिररमधून पाहण्यावर सरकारचा भर आहे. आर्थिक पाहणीत अर्थव्यवस्थेचा वस्तुनिष्ठ दृष्टिकोन दिसत नाही.”

माजी अर्थमंत्री म्हणाले की, “या आर्थिक पाहणी अहवालात भारतीय अर्थव्यवस्थेचा वस्तुनिष्ठ दृष्टिकोन दिसत नाही. यात केवळ नकारात्मक घटकांचा समावेश करण्यात आला आहे. दुसऱ्या बाजूला जागतिक अर्थव्यवस्था मंदावली आहे. या नकारात्मक घटकांना सामोरे जाण्यासाठी कोणते पर्याय आहेत हे सांगण्यात आले नाहीत.”

हे ही वाचा >> Budget 2023 : सात लाखांच्या उत्पन्नावर आयकर नाही, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची महत्त्वाची घोषणा

हे ही वाचा >> मोठी स्वप्ने पूर्ण करणारे निर्भय सरकार! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे अभिभाषणात कौतुकोद्गार

अर्थव्यवस्था मंदीच्या विळख्यात सापडू शकते

चिदंबरम म्हणाले की, “आर्थिक पाहणी अहवालात कुठेही पाहायला मिळालं नाही की, नकारात्मक गोष्टींचा सामना करण्यासाठी काय करायला हवं, किंवा कोणत्या उपाययोजना केल्या जातील. हाच या अहवालातला सर्वात मोठा आभाव आहे. जागतिक अर्थव्यवस्था मांदवली आहे, ती पुढे अजून धिमी होईल. प्रमुख अर्थव्यवस्था या मंदीच्या विळख्यात सापडतील. जगभरात सुरक्षेची स्थिती खराब होईल. रशिया-युक्रेन युद्ध गेल्या १० वर्षात अधिक तीव्र झालं आहे, तर चीन रशियाला चिथावणी देत आहे. याचेदेखील गंभीर परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होतील.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Govt looking through rearview mirror rather than windshield p chidambaram criticises economic survey asc