सध्या तरुणाईचे आकर्षण असलेल्या सोशल मीडियाचा गैरवापर वाढतोय. सोशल मीडियावर चिथावणीखोर मजकूर, छायाचित्रे प्रसिद्ध केली जात आहेत. त्यामुळे धार्मिक दंगलींना चालना मिळते. त्यामुळेच हे गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालय उपाययोजना करणार आहेत, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शनिवारी दिली. ‘जुनी चिथावणीखोर छायाचित्रे फेसबुकवर प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे सध्या घडलेल्या दंगलींना त्यामुळे चालना मिळाली,’ असे सांगून शिंदे यांनी मुझफ्फरनगर दंगलीचा अप्रत्यक्ष उल्लेख केला. पाटणा येथील एका हिंदी वृत्तपत्राचे प्रकाशन करताना शिंदे बोलत होते. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव हेही या वेळी उपस्थित होते. ‘सोशल मीडियावर ईशान्य भारताविषयीही चिथावणीखोर मजकूर प्रसिद्ध झाला होता. तो प्रसिद्ध करणाऱ्या संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे,’ असा इशारा त्यांनी दिला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा