नैसर्गिक वायूच्या किंमती ठरवण्याच्या मुदद्यावरून पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली यांना सध्या अनेक वादांना तोंड द्यावे लागते आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या काळात सीएनजी विक्रेत्यांनी ग्राहकांच्या माहितीसाठी इंधनाच्या दराची विभागवारी जाहीर करावी, असे आदेश केंद्रीय पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली यांच्याकडून देण्यात आले आहेत. सरकारकडून देशांतर्गत स्वस्त दरात इंधनाचा पुरवठा केला जातो, याबद्दल जनतेला विश्वास वाटावा यासाठी सीएनजीच्या दराची विभागवारी जाहीर करण्याचे आदेश सीएनजी विक्रेत्यांना देण्यात आलेत. सध्याच्या व्यवस्थेनुसार पेट्रोल, डिझेल, केरोसीनसारख्या कोणत्याही पेट्रोलियम पदार्थांची विक्री करताना ग्राहकांना इंधनाच्या दरांच्या विभागवारीची कोणतीही माहिती देण्यात येत नाही. पेट्रोलियम मंत्रालयाने दिलेल्या आदेशानंतर पहिल्या टप्प्यात वाहनांसाठी वापरण्यात येणा-या सीएनजी आणि घरगुती सिलिंडरच्या किंमतीची विभागवारी ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येईल.
विक्रेत्यांना इंधनाच्या किंमतीची विभागवारी जाहीर करण्याचे आदेश
नैसर्गिक वायूच्या किंमती ठरवण्याच्या मुदद्यावरून पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली यांना सध्या अनेक वादांना तोंड द्यावे लागते आहे.

First published on: 19-02-2014 at 04:33 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Govt orders cng retailers to provide cost break up