मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी याकुब अब्दुल रझाक मेमन याचा दयेचा अर्ज फेटाळून त्याला फाशी देण्यात यावी, अशी विनंती गृहमंत्रालयाने राष्ट्रपतींना केली आहे. महाराष्ट्र सरकारच्या निर्णयानंतर गृहमंत्रालयाने नुकतेच राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना पत्र पाठविल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
१९९३ मध्ये मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटांमध्ये २५७ जणांचा बळी गेला होता. तर ७१३ जण गंभीर जखमी झाले होते. याकुबने दहशतवादी कारवाया घडवण्यासाठी आíथक मदत केल्याचे तसेच मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडविणाऱ्या इतर आरोपींनाही मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
त्याला १९९४ मध्ये काठमांडू येथे अटक करण्यात आली होती. टाडा न्यायालयाने २००७ मध्ये याकुबला फाशीची शिक्षा ठोठावली आहे. त्यानंतर त्याने या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र सर्वोच्च न्यायालयानेही टाडा न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले. हा सर्व कट अंमलात आणण्यासाठी याकूब मेमनचाच हात असल्याचे स्पष्ट होत आहे, असे मत न्यायालयाने व्यक्त केले होते. व्यवसायाने चार्टड अकाउंटट असणारा याकुब हा या बॉम्बस्फोटांमागील सूत्रधार आणि फरार आरोपी टायगर मेमन याचा भाऊ आहे. याकुबला फाशी देण्याच्या टाडा न्यायालयाच्या निर्णयाचे सर्वोच्च न्यायालयानेही समर्थन केले होते. त्यामुळे ऑक्टोबर २०१३ मध्ये याकुबने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला होता.
याकुब मेमनला फाशीच द्या
मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी याकुब अब्दुल रझाक मेमन याचा दयेचा अर्ज फेटाळून त्याला फाशी देण्यात यावी, अशी विनंती गृहमंत्रालयाने राष्ट्रपतींना केली आहे.
आणखी वाचा
First published on: 21-03-2014 at 03:45 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Govt recommends rejection of mercy petition of yakub memon