जनुकीय विकसित पिकांप्रमाणे शास्त्रोक्त पद्धतीने विकसित करण्यात आलेल्या पिकांबाबत काही वावडय़ा उठविण्यात आल्या असून त्याबाबत सरकारने भरकटून जाऊ नये, असे मत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. उत्तम पिकासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरलीच पाहिजे, असा आग्रहही पवार यांनी धरला आहे.
सध्या लागवडीखाली असलेल्या क्षेत्रात अधिकाधिक लागवड करूनच पिकाची वाढ करता येईल. त्यामुळे आपल्याला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरलीच पाहिजे, असे आपले ठाम मत आहे. आपले शास्त्रज्ञ सर्व प्रकारची खबरदारी घेऊन संशोधन करीत असल्याने त्यांच्यावरील विश्वासाला तडा जाऊ देणे आपल्याला परवडणारे नाही, असेही पवार म्हणाले.
जनुकीय पिकांची प्रत्यक्ष चाचणी घेण्यावर संसदीय पथकाने बंदीची शिफारस केली असल्याच्या पाश्र्वभूमीवर पवार यांच्या मताला महत्त्व प्राप्त झाले आहे. बीटी वांग्यावर र्निबध घालण्यात आले असून सध्या अन्नधान्याची पिके वगळता केवळ बीटी कापसालाच व्यापारी लागवडीची परवानगी देण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.

Story img Loader