केंद्र सरकार प्रत्येक भारतीय नागरिकाला राष्ट्रीय ओळखपत्र देण्याच्या तयारीत असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रीय जनगणना नोंदणी प्रकल्पांतर्गत ही नवी योजना राबवण्यात येणार आहे.
यामधून देशातील खऱया भारतीय नागरिकांची संख्या लक्षात येईल आणि अवैधरित्या भारतीय नागरिकत्व मिळविणाऱयांवरही आळा बसेल असेही राजनाथ सिंह म्हणाले आहेत.
देशात घुसखोरी वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर लोकसभेमधील भाषणात बोलत असताना राजनाथ सिंह म्हणाले की, “देशात खऱया भारतीय नागरिकांना ओळखण्याची गरज असून राष्ट्रीय ओळपत्र देण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही महत्वाची पाऊले उचलणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत याच विषयावर युनिक आयडेंटिफिकेशन ऍथॉरिटी ऑफ इंडिया(युआयडीएआय) आणि एनपीआर सोबत बैठक झाली असून या दोघांच्या सहकार्याने सर्वसमावेशक डेटाबेस तयार करण्यात येणार आहे.” तसेच “ही माहितीची नोंदणी प्रक्रिया वक्तशीर पद्धतीने केली जाणार आहे. त्यातून कोण भारतीय आहे आणि कोण नाही हे ओळखता येईल. प्रत्येक भारतीय नागरिकाला राष्ट्रीय ओळपत्र दिले जाणार आहे.” असेही राजनाथ सिंह म्हणाले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा