गुजरातमध्ये एका तरुणीवर पाळत ठेवण्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकार १६ मे पूर्वी न्यायाधीशांची नियुक्ती करेल, असे केंद्रीय कायदा मंत्री कपिल सिब्बल यांनी शुक्रवारी सांगितले. गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर तेथील एका तरुणीवर पाळत ठेवल्याचा आरोप आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर केंद्र सरकारने न्यायाधीशांच्या नेतृत्त्वाखालील आयोगाकडून त्याची चौकशी करण्याचे जाहीर केले होते.
सिब्बल यांनी यावेळी अरूण जेटली यांच्यावरही टीका केली. केवळ नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधण्यासाठी कोणतेही न्यायाधीश त्यांची चौकशी करण्यास तयार होणार नाही, असे जेटली यांनी म्हटले होते. सिब्बल यांनी जेटलींचा हा दावा फेटाळून लावला. ते म्हणाले, या प्रकरणाची चौकशी करणाऱया न्यायाधीशांचे नाव १६ मे पूर्वी आम्ही जाहीर करू. चौकशीमुळे भाजपचे नेते इतके का घाबरली आहेत, हे मला समजत नाही. एकदा केंद्र सरकारने चौकशी आयोग नेमल्यानंतर मोदींना कोणीच वाचवू शकणार नाही, हे माहिती असल्यानेच भाजपचे नेते चौकशीला घाबरत आहेत, असाही आरोप सिब्बल यांनी केला. मोदी यांनी गुजरातमधील तरुणीवर पाळत ठेवल्याचे कागदोपत्री पुरावे असल्याचेही सिब्बल यांनी सांगितले.
‘मोदींच्या चौकशीसाठी न्यायाधीशांचे नाव १६ मे पूर्वी जाहीर करू’
गुजरातमध्ये एका तरुणीवर पाळत ठेवण्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकार १६ मे पूर्वी न्यायाधीशांची नियुक्ती करेल, असे केंद्रीय कायदा मंत्री कपिल सिब्बल यांनी शुक्रवारी सांगितले.
First published on: 02-05-2014 at 01:26 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Govt to name snoopgate judge before may 16 sibal