केंद्रीय अन्वेषण विभागाची (सीबीआय) वैधता सिद्ध करण्यासाठी केंद्र सरकार आवश्यक ते सर्व प्रयत्न करेल, असे प्रतिपादन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सोमवारी केले. सीबीआय अधिकाऱयांच्या एका परिषदेमध्ये बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले.
सीबीआय विश्वासार्हच -सुशीलकुमार
डॉ. सिंग म्हणाले, सीबीआय या तपास यंत्रणेची भूतकाळ आणि वर्तमानकाळातील कामे कायदेशीर असल्याचे सिद्ध करण्यासाठी सरकार आवश्यक अशा सर्व गोष्टी करेल. सीबीआयची वैधता टिकवण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करेल, असेही त्यांनी सांगितले.
सीबीआयला बेकायदा ठरविणारा निकाल स्थगित
गुवाहाटी उच्च न्यायालयाने सीबीआय बेकायदा असल्याचा निकाल गेल्या आठवड्यात दिला होता. सीबीआयच्या निर्मितीसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने एक एप्रिल १९६३ रोजी केलेला ठरावच बेकायदा असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर डॉ. सिंग यांनी केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट केली. गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला दोन दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
कायदेशीर खुसपटखोरी
सीबीआयची वैधता सिद्ध करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न – पंतप्रधान
केंद्रीय अन्वेषण विभागाची (सीबीआय) वैधता सिद्ध करण्यासाठी केंद्र सरकार आवश्यक ते सर्व प्रयत्न करेल, असे प्रतिपादन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मंगळवारी केले.
First published on: 11-11-2013 at 01:11 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Govt will work to protect legitimacy of cbi says manmohan singh