भारतीय शास्त्रीय संगीताला जगाच्या कानाकोपऱ्यात नेणारे दिवंगत सतारवादक पं. रविशंकर यांना मरणोत्तर ग्रॅमी जीवनगौरव पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. लॉस एंजेलिस येथे १० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ५५ व्या ग्रॅमी पुरस्कार वितरण सोहळ्यात हा पुरस्कार देण्यात येणार असून असा सन्मान मिळविणारे ते पहिले भारतीय ठरले आहेत.
पं. रविशंकर यांचे बुधवारी निधन झाले. मात्र त्यांची या सन्मानासाठी निवड त्याआधीच करण्यात आली होती तसेच ग्रॅमीचे अध्यक्ष नील पोर्टनोव यांनी दूरध्वनीद्वारे ही बातमी पं. रविशंकर यांना तेव्हाच कळवली होती, असे ग्रॅमीच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
आपल्या ८० वर्षांच्या सांगीतिक कारकिर्दीत अनेकांवर प्रभाव पाडणाऱ्या या लोभस व्यक्तिमत्त्वाने बांगलादेश या नवराष्ट्राला आर्थिक संकलनासाठी आपल्या मैफलीद्वारे मदत केली होती.
तीन वेळा ग्रॅमी पुरस्कार जिंकणारे पं. रविशंकर हे खरेखुरे जागतिक संगीताचे दूत होते, अशा शब्दांत ग्रॅमीने त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा