हिग्ज बोसॉनच्या सिद्धान्ताचे गूढउकलत असतानाच गुरुत्वाकर्षण लहरींबद्दलचे गूढही उकलले असूनयामुळे विज्ञानक्षेत्रात सलग दुसरे मोठे यश मिळाले आहे. ‘बायसेप-२च्या दक्षिण ध्रुवावरील दुर्बीणीच्यामाध्यमातून या लहरी आढळल्याचे वैज्ञानिकांनी स्पष्ट केले आहे. विश्वाच्या उत्पत्तीच्या वेळी झालेल्या महास्फोटानंतर फोटॉनच्या आकाराचे विश्व क्षणार्धात छोटय़ा चेंडूच्या आकारापर्यंत प्रसरण पावले. हा प्रसरणाचा वेग अतिप्रचंड होता. हे सांगणारा एक ‘इन्फ्लेशन सिद्धान्त’ काही वर्षांपूर्वी मांडण्यात आला होता. हा सिद्धान्त जर खरा असेल तर तो सिद्ध करण्यासाठी उत्पत्तीच्या वेळेच्या सूक्ष्म तरंगांचा अभ्यास करणे गरजेचे होते. हे सूक्ष्म तरंग एका समान पातळीवर असतील असाही अंदाज होता. या तरंगांचा अभ्यास करण्यासाठी निर्मनुष्य जागा अपेक्षित होती. यासाठी‘बायसेप-२’ने आंटाक्र्टिकामध्ये ही दुर्बिण लावली होती. या दुर्बिणीच्या माध्यमातून विश्वातील विविध भागांमधून येणाऱ्या सूक्ष्म तरंगांचा अभ्यास करण्यात आला. आपल्यासर्व बाजूंनी येणाऱ्या सूक्ष्म तरंगांमुळेगुरुत्वीय लहरींमुळे निर्माण होणारीअनियमितता या अभ्यासात दिसूनआली. या दुर्बिणीतून मिळवलेले छायाचित्र हे इन्फ्लेशन सिद्धान्त खराकरणारा थेट पुरावा असल्याचेवैज्ञानिकांचे मत आहे. आपल्याकडे गुरुत्वाकर्षण लहरींचा हा फोटो असणेहे खूप मोठे यश आहे. दुर्बिणीच्या आधारे मिळालेली माहिती ही गणितीयआणि सामान्य परस्परसंबंध पातळीवरतपासण्यात आली आहे, मात्र या छायाचित्राच्या विविध पातळय़ांवरीलचाचण्या बाकी असल्याचे मतस्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि बायसेप२चे सहप्रमुख चाओ लीन कुओ यांनीस्पष्ट केले. या लहरींच्या शोधामुळेविश्व निर्मितीच्या महास्फोटसिद्धान्ताला प्रबळ पुष्टी मिळाली आहे.

Story img Loader