‘द ग्रेट खली’ने पंजाबमधील जालंधर जिल्ह्यातील फिल्लौर भागात एका टोल कर्मचाऱ्यासोबत गैरवर्तन केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच खलीने त्याला कानाखाली लगवाल्याचेही समोर आले आहे. टोल कर्मचारी सेल्फी घेण्यासाठी कारजवळ आल्याने खलीचा राग अनावर झाला होता.

हेही वाचा – “फक्त देवच अशा वकिलांपासून वाचवू शकतो,” युक्तिवाद ऐकल्यानंतर केरळ हायकोर्टाच्या न्यायमूर्तींनी नोंदवलं निरीक्षण

‘द ग्रेट खली’ पंजाबमधील जालंधर जिल्ह्यातील फिल्लौर भागातून जात असताना एका टोलवर त्याने गाडी थांबवली होती. तेवढ्यात टोल कर्मचारी खलीला पाहून सेलफी घेण्यासाठी खलीच्या गाडीजवळ आला. मात्र, त्यामुळे खली राग अनावर झाला. त्याने टोल कर्मचाऱ्याशी असभ्य वर्तन सुरू केले. तसेच अर्वाच्च भाषेत शिवीगाळही केली आणि टोल कर्मचाऱ्या कानाखालीही लगावली.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत प्रकरण शांत प्रकरण्याचा प्रयत्न केला. अखेल खलीने गाडीच्या खाली उतरून कर्मचाऱ्याची माफी मागितली.

हेही वाचा – ‘मी भारत भेटी दरम्यान गोळा केलेली माहिती आयएसआयला पुरवली, मात्र..’; मुलाखतीदरम्यान पाकिस्तानी लेखकाचा दावा

Story img Loader